सिद्धार्थ पिठाणी आणि मिरांडाचीही झाडाझडती
गुरुवारी सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धा पिठानी, कुक नीरज सिंह आणि केशवची 14 तास चौकशी केली. गुरुवारी रियाची एक मुलाखत समोर आली, यामध्ये तिने आपल्यावर लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले, तसेच सुशांतच्या कुटुंबावर आरोप लावले. रिया चक्रवर्तीला पहिल्यांदा सीबीआयसमोर आली आहे. तिच्यासोबत भाऊ शोविकही आहे. डीआरडीओ गेस्टहाऊसमध्ये सुशांतचा मित्र सिद्धा पिठानी आणि हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडाही उपस्थित आहे. सीबीआय सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईतील डीआरडीओ अतिथीगृहात ही चौकशी झाली. शौविकचा जबाबही नोंदवण्यात आला. पिठानीची एजन्सीने सलग सातव्या दिवशी चौकशी केली.
आज सुशांतच्या पोस्टमार्टमचा फॉरेन्सिक अहवाल येणार?
सुशांतच्या पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाची फॉरेन्सिक तपासणी करणारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) आज सीबीआयला आपला अहवाल सादर करू शकते. असेही बोलले जात आहे की एम्सची टीम सोमवारी मुंबईला भेट देऊ शकते. हे पथक शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांची भेट घेणार आहे. गुरुवारी एम्समधील फॉरेन्सिक तपासणी पथकाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टम अहवालात बर्याच गोष्टी अपूर्ण असल्याचे सांगितले होते. आता खुनाच्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम मुंबईतील कूपर रुग्णालयात झाले.